• 3 years ago
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतील प्रस्तावित उड्डाणपुलांचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा हा चौथा महत्त्वाचा जोडरस्ता ठरणार असून गोरेगाव ते मुलुंड अंतर २० मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. गोरेगाव-मुलुंड या जोडरस्त्याची लांबी १२.२ किमी असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव पूर्व येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड पूर्व येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा रस्ता जाणार आहे. यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेली झाडांवर 1265 वृक्ष मुंबई महापालिकेकडून तोडण्यात येणार आहेत. पालिकेच्या एस विभागा अंतर्गत 811 वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी झाडांनाच नोटीस लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी...

Category

🗞
News

Recommended