• 3 years ago
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत पोषण आहरतील खिचडीत पाल निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेत 23 विध्यार्थ्यांना विषबाधा झालीय. उमरगा तालुक्यातील पेटसांगवीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी विध्यार्थ्यांना हा पोषण आहार देण्यात आला. मात्र हा आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी मळमळ होण्याचा त्रास होऊ लागला. विध्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आल. 12 तास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेऊन मुलांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आल. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सुखरुप आहेत. वारंवार अशा घटना घडताना पाहायाला मिळतायत. कधी एक्सपायर पोषण आहाराची पाकीट मुलांना दिली जातात तर कधी आज घडलेला प्रकारा सारखे अनेक घटना समोर येतात ...त्यामुळे चुक कोणाचीही असो शासनाची किंवा शाळेची, पण हा निष्काळजीपणा किंवा ही चुक मुलांच्या जीवावर बेतू शकते.याची दखल घेण तितकच महत्तवाचं आहे.

Category

🗞
News

Recommended