• 3 years ago
मंगळवारी मुंबईच्या वानखेडे मैदानात झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स सामन्यात गुजरातने राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर लखनौवर पाच विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान राहुल तेवतिया याने पुन्हा एकदा आयपीएलमधील तो एक दमदार खेळाडू असल्याचं दाखवून दिलं. यंदा त्याला गुजरात संघाने 9 कोटी देऊन विकत घेतलं होतं. त्यानंतर अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. पण राहुलने पहिल्याच सामन्यातील या खेळीमुळे सर्वांना उत्तर दिलं असून वीरेंद्र सेहवाग यानेही राहुलच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना चांगलच उत्तर दिलं. गुजरात विरुद्ध लखनौ सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागने क्रिकबजशी बोलताना राहुलच्या खेळीवर आपलं मत दिलं. गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये विजयी सुरुवात करताना लखनौ सुपर जायंट्स संघाला ५ विकेटसन नमवलेल . पण राहुल तेवतियानं गेमच चेंज केला . आणि त्याला साथ दिली डेव्हिड मिलरनं राहुल तेवतिया यांनी पाचव्या विकेटसाठी केलेली ६० धावांची भागीदारी गुजरातच्या विजयात निर्णायक ठरली. मिलर आणि राहुलने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर आवेश खानने मोक्याच्या क्षणी मिलरला बाद केले. मिलरने 30 धावांची खेळी केली. त्यानंतर राहुल तेवातिया आणि युवा अभिनव मनोहर यांनी गुजरतला विजय मिळवून दिला. राहुलच्या 24 चेंडूतील नाबाद 40 धावा सर्वात या सामन्यात खुप महत्त्वपूर्ण ठरल्यात.

Category

🗞
News

Recommended