• 3 years ago
लग्नाच्या मिरवणुकीत बेधुंद नाचणं, एका 25 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलंय.
बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये अक्षय माने याचा विवाह सोहळा होता. या लग्नातील नवरा-नवरी दोघेही शिंदेवाडी गावातील रहिवासी आहेत. नवरदेव अक्षय माने याच्या विवाहाला वैभव राऊत याच्यासह माजलगाव येथील मित्रही आले होते. यावेळी लग्नापूर्वी मारुतीला पाया पडण्यासाठी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या ढोल ताशांच्या तालावर सर्व तरुण मंडळी बेधुंद नाचत होती.

Category

🗞
News

Recommended