• 3 years ago
महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक तापमान असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात मार्च महिन्यातच 41 अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचले आहे. काल 24 मार्चला अकोल्यात 42.0 अंश सेसलिअस तर आज 25 मार्च'ला 42.6 अंश सेसलिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मार्च महिन्यातच अकोल्यातील सर्वाधिक तापमान जाणवत आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्या कारणाने दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यावरील नागरिकांची संख्या कमी झाली आहे तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक उसाचा रस ज्यूस, ज्यूस पित उन्हापासुन काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. रस्त्यावर नागरिक रुमाल बांधून उन्हापासून रक्षण करीत आहेत.तर थंड पाण्यासाठी बाजारात मातीचे माठ विक्रीला आले आहेत. आवश्यक काम असल्यासस नागरिकांनी घराबाहेर पडावे असा सल्ला आरोग्य विभागाने दिलाय..

Category

🐳
Animals

Recommended