Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/25/2022
पायात तब्बल आठ किलोची नागीण चप्पल, ग्रामीण शैलीतील पोषाख, डोक्यावर फेटा, आणि डोळ्यावर गॉगल लावला अगदी साऊथच्या हिरोसारखे दिसणारे हे आहेत केराप्पा. त्यांच्याकडे पाहिलं की त्यांचं वय ६० वर्षे आहे यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. एका वेगळ्याच छंदामुळे जिल्हाभर त्यांची सध्या चर्चा आहे. माण तालुक्यातील जांभुळणी गावचे केराप्पा थोडीथिडकी नव्हे, तर तब्बल आठ किलोची चप्पल पायात घालतात. यामागचं कारण आहे फक्त हौस. केरप्पांनी ही चप्पल खास कारागिराकडून अकलूजमधून बनवून घेतलीय. कितीही खर्च आला तरी ते मागेपुढे पाहत नाहीत. कारण, हा छंदच असा आहे की तिथे हौसेला मोल नाही. वयाच्या १५ व्या वर्षापासून ते मेंढरांमागे जाताना ही चप्पल वापरतात. या चपलीला केराप्पा पोटच्या मुलासारखं जपतात. चप्पलला रोज अत्तर लावून व्यवस्थित पुसून ठेवण्याचं काम ते नित्यनियमाने करतात. लग्न समारंभ किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात किंवा गजी नृत्यामध्ये केराप्पा ही चप्पल घालून जातात. या ८ किलोच्या चप्पल मुळे केराप्पा यांना सेलिब्रिटी प्रमाणेच वागणूक मिळते.

Category

🐳
Animals

Recommended