हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप

  • 2 years ago
मुंबईत २२ डिसेंबर २०२१ पासून हिवाळी अधिवेशन सुरू झालं असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणास्तव अधिवेशनाला हजर न राहिल्याने भाजपाकडून अनेक आरोप केले जात आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री यांच्यावर आरोप केले जात असतांना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या १४ दिवसात किती वेळा उपस्थित होते?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मोदी हे उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत गुंतले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी सल्ला द्यावा, असं देखील भास्कर जाधव म्हणाले.

#hiwaliadhiveshan #Shivsena #BJP #BhaskarJadhav

Recommended