टेक्सास - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात राहणारे जॉर्डन स्पॅन यांच्या मुलाचे दीड वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते त्याच मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकण्याची संधी त्यांना नुकतीच मिळाली मॅथ्यूचे असे त्या मुलाचे नाव होते 17 ऑक्टोबर 2018 रोजी मॅथ्यू मोठ्या अपघातानंतर रुग्णालयात दाखल झाला 10 दिवस ब्रेन डेड राहिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली एक अॅथलीट राहिलेल्या मॅथ्यूने आधीच अंगदान करणार असल्याचे ठरवले होते त्याच्या अंगदानाने 5 जणांना जीवनदान मिळाले त्यापैकीच एक 54 वर्षीय महिलेला मॅथ्यूचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले होते या महिलेची आणि मॅथ्यूचे वडील जॉर्डन यांची 10 फेब्रुवारी रोजी भेट झाली यावेळी जॉर्डन यांनी स्टेथोस्कोप घेऊन आपल्या मुलाच्या हृदयाची स्पंदने ऐकली तसेच आपल्याच विश्वात हरवून गेले
Category
😹
Fun