Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/8/2020
ग्रामीण भागातल्या मुस्लिम समुदायातील मुलींना मासिक पाळी सुरू झाली की, त्यांचे बालवयातच लग्न लावून देण्याची परंपरा अजूनही कायम आहे फुलंब्री तालुक्यातील धामणगावातील सहावी-सातवीतील चार मुलींच्या पालकांनीही त्यांचे पुढील शिक्षण याच कारणामु‌ळे बंद केले होते हे ऐकून त्यांच्या वर्गमैत्रिणींना खूप वाइट वाटले त्यांनी शिक्षिकेसोबत चर्चा केली आणि त्या मुलींना पुन्हा शाळेत आणण्याचा चंग बांधला पालकांना शाळेत बोलावले डॉक्टरांकडून त्यांचे गैरसमज दूर केले तसेच गावामध्ये पथनाट्य सादर करून मुलींना शिकवण्याचा संदेश दिला अशा प्रकारे पालकांचे मतपरिवर्तन झाले आणि त्या चार मुली आता नियमित शाळेत येतात, खेळतात, बागडतात, वेगवेगळ्या उपक्रमांत सहभागी होतात वाघिणीचे दूध पिण्यास पुन्हा त्या सज्ज झाल्या महत्त्वाचे म्हणजे हा फक्त चार मुलींचा प्रश्न नसून सामाजिक विषय आहे यामुळे भविष्यात अनेक मुलींना फायदा होईल

Category

😹
Fun

Recommended