पुणे - पुण्यातील काही प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण असल्याची खोटी माहिती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे पुण्यातील कोरेगाव पोलिस ठाण्यात अफवा पसरवल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या या तक्रारीमध्ये अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हॉटेलमध्ये कोरोना रुग्ण आहेत तर काही ठिकाणच्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झाला आहे एवढेच नव्हे, तर काही परदेशातील नागरिक राहत असल्याची माहिती त्याने फोनवरून दिली होती
Category
😹
Fun