औरंगाबाद - शिवसेनेच्या मावळत्या अध्यक्षा अॅड देवयानी डाेणगावकर यांनी भाजपचा पाठिंबा घेत केलेली बंडखाेरी आणि एका महिला सदस्याच्या मतातील स्वाक्षरीच्या वादामुळे आणि उशिरा पाेहाेचलेल्या भाजपच्या महिला सदस्य छाया अग्रवाल यांच्या मतदानाचा अधिकार नाकारल्याचा आराेप करून शुक्रवारी दुपारी आैरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सभेतगाेंधळ झाला या गोंधळामुळे सभा तहकूब करावी लागली या प्रकारामुळे सभागृहाबाहेर शिवसेना-भाजप समर्थकांमधील संघर्ष पेटला असताना पाेलिसांनी साैम्य लाठीहल्ला करावा लागल्याचा प्रकार जिपत झाल्याने या अध्यक्षपदाच्या निवडणूकीला अंतर्गत राजकारणाचा रंग आला असून, गदरोळामुळे उद्या शनिवारी पुन्हा मतदानाची प्रक्रिया होणार आहे
Category
😹
Fun