• 5 years ago
औरंगाबाद : 'कदाचित अजूनही' कवितासंग्रहातील कविता ही काळानुरूप बदललेली कविता आहे वाढत जाणारे वय आणि आजूबाजूची परिस्थिती याचा तो परिणाम असू शकेल, असे अाैरंगाबादेतील कवयित्री अनुराधा काैतिकराव पाटील यांनी सांगितले साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्या 'दिव्य मराठी'शी बोलत होत्या

या पुरस्कारामुळे आनंद झाला आहे २०१७ ला हा कवितासंग्रह आला त्यानंतर दोन वर्षे लागलीत त्याचे मूल्यमापन व्हायला पण, उशिरा का असेना पुरस्काराने आनंदच दिला आहे, असेही अनुराधा पाटील म्हणाल्या अशीच प्रतिक्रिया त्यांचे पती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनीही व्यक्त केली अनुराधा पाटील यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दांत

Category

😹
Fun

Recommended