• 2 years ago
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उदघाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना भाजप आमदारांनी वादग्रस्त विधान केले आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना महिलांचा मोठ्या प्रमाणात विचार केला आहे. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस महिलांवर फिदा आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले. मुलगी शिकायला गेल्यावर त्याला सुद्धा पैसे द्यायचं ठरवलं. परत पाचवी, सहावीला गेल्यावर 5 ते 6 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलगी 18 वर्षानंतर तिला 15 किंवा 18 हजार रुपये मिळतील. मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केलं, महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, असंही यावेळी सुभाष देशमुख म्हणाले.

#DevendraFadnavis #SubhashDeshmukh #BJP #Solapur #ViralVideo #Education #FinanceMinister #Budget #MaharashtraBudget #Politics #BJPMLA #WomenPolicy #GovernmentPolicy #GirlsEducation

Category

🗞
News

Recommended