• 2 years ago
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बीडच्या परळी मध्ये बालाजी डेकोरेशन अॅड इव्हेंट्सचा उद्घाटन शुभारंभ पार पडला. यावेळी परळीकरांसह राजकीय नेते उपस्थित होते. दरम्यान झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंनी इव्हेंट अॅड डेकोरेशन्स व्यावसायिकांना कानमंत्र दिला. त्याबरोबरच परळीकरांसमोर पंकजांनी मनमोकळे भाषण केले. राजकारण निर्दयी असते, त्यात माणसाला स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी जपता येत नाहीत. स्वतः आजारी असले की जावे लागते. घरात कोणी आजारी असले की जावे लागते, आपल्याला दुःख असले तरी हसावे लागते. त्यामुळे राजकारण सोपे नाही ते खूप निर्दयी असते, असे म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्या भावनांना परळीकरांसमोर वाट मोकळी करून दिली.

#PankajaMunde #Parli #Beed #BJP #Politics #DhananjayMunde #NCP #Maharashtra #HWNews #Emotional #EventManagement #Decoration

Category

🗞
News

Recommended