• 2 years ago
ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन महाविकास आघाडीकडून ठाण्यात आज भव्य जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर या मोर्चाची सांगता झाली. यावेळी सभेचं आयोजन करण्यात आलेलं. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वात आधी भाषणाला सुरुवात केली. यावेळी सुषमा अंधारे यांनी काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात आल्यानंतर त्यांची आणि पोलीस आयुक्तांची भेट का येऊ शकली नाही? याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलीस आयुक्तांनी मुद्दामून ती भेट टाळली, असा सुषमा अंधारे यांचा दावा आहे.

#UddhavThackeray #SushmaAndhare #RoshniShinde #ThaneCommissioner #MahavikasAghadi #MVA #NarayanRane #RajuShetti #AbdulSattar #MassCopy #Politics #Aurangabad #Maharashtra

Category

🗞
News

Recommended