राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवादील झाला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मात्र, या संकटांना पायदळी तुडवून नव्या जोमाने उभ्या राहणाऱ्या बळीराजाला आता वेगळ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. सांगलीत रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांची जात विचारली जात आहे. यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मध्ये वाद सुरू झाला आहे. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते. अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशिन यंत्रणा आहे. रसायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांचा आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पोत्यांची संख्या सांगितल्यानंतर पॉस मशिनवर अंगठा देऊन खत मिळायचे. मात्र, सांगलीत गेल्या तीन-चार दिवसांपासून रसायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना थेट त्यांची जात विचारली जात आहे.
#fertilizer #caste #sangali #JayanPatil #ajitpawar #maharashtraassembly #ajitpawar #opposition #protest #bjp #bjpgovt #ncp #shivsena #congress #prithvirajchauhan #nanapatole #hwnewsmarathi
#fertilizer #caste #sangali #JayanPatil #ajitpawar #maharashtraassembly #ajitpawar #opposition #protest #bjp #bjpgovt #ncp #shivsena #congress #prithvirajchauhan #nanapatole #hwnewsmarathi
Category
🗞
News