Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/3/2023
पुण्यातील कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडी विरुध्द भाजप असाच सामना रंगला होता. खरंतर राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी रंगत पहायला मिळाली. एकीकडे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आपले केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रीमंडळ, आमदार आणि नगरसेवकांचा मोठा फौजफाटा प्रचारात आणला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले अशा प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवलं होतं. पण कसब्यात 28 वर्षांचा इतिहास असलेला भाजपचा बालेकिल्ला यंदा पार उद्ध्वस्त झाला, कसा काय? महाविकास आघाडीने नक्की काय चाल चालवली?आणि भाजपचं घोडं नक्की कुठे अडलं हे समजून घेऊया.

#Kasba #RavindraDhangekar #DevendraFadnavis #NanaKate #RahulKalate #BJP #Chinchwad #Bypoll #Pune #Congress #MahavikasAghadi #Maharashtra

Category

🗞
News

Recommended