• 2 years ago
आमदार, खासदारानंतर शिवसेना (Shivsena) पक्ष तसंच धनुष्यबाण चिन्ह गेल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता ठाकरेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. शिवाई ट्रस्ट (Shivai Trust) विरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्रस्टच्या मालमत्तेचा राजकीय वापर केल्याचा आरोप यशस फर्मकडून करण्यात आला आहे. यशस फर्मच्या योगेश देशपांडे यांनी शिवाई ट्रस्टविरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. सेनाभवनचा (Senabhavan) मालकी हक्क शिवाई ट्रस्टकडे आहे. पण आता शिवाई ट्रस्टविरोधातच तक्रार दाखल झाल्यामुळे ठाकरेंच्या हातातून सेनाभवनही जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

#UddhavThackeray #Senabhavan #EknathShinde #Shivsena #SanjayRaut #BJP #ShivaiTrust #Dadar #Mumbai #Twitter #ShambhurajDesai #ElectionCommission #EC #Dombivali #Kalyan #Politics #Maharashtra

Category

🗞
News

Recommended