ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सुनील बागुल यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिकला आलो आहे. या दौऱ्यावेळी ते म्हणाले की, मला आज दिल्लीला सुप्रीम कोर्टात जायचे होते, मात्र शिवसेनेचा नेता असेल कोणत्याही सभेत गर्दी कमी पडत नाही असंही त्यांना यावेळी सांगितले. सुनील बागुल आपण अजातशत्रू असल्याचे सांगत संजय राऊत यांनी त्यांचा गौरवही केला. शिवसेनेवर संकट येत आहे शिवसेना संपून जावी, ती नष्ट व्हावी यासाठी इथूनपासून दिल्लीपर्यंत कटकारस्थान चालू आहेत. मात्र कुत्रा निष्ठावान असतो. कुत्रा कितीही निष्ठावान असला तरी वाघाच्या सेनेसोबत लढण्यासाठी कुत्र्यांची फौज चालत नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
#SanjayRaut #EknathShinde #SunilBagul #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Nashik #Politics #SupremeCourt #DadaBhuse #SuhasKande #Guwahati #Rebel #Maharashtra
#SanjayRaut #EknathShinde #SunilBagul #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Nashik #Politics #SupremeCourt #DadaBhuse #SuhasKande #Guwahati #Rebel #Maharashtra
Category
🗞
News