• 2 years ago
राष्ट्रवादी नेते एकनाथ खंडसे यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. सुरेश दादा जैन मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र मला जो मुख्यमंत्री पाहिजे आहे तो कार्यक्षम दूरदृष्टीचा आणि सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री पाहिजे असल्याचे मत त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केले होते. आपल्या परिसरात विद्यापीठ आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय यासह सिंचनासाठीचा निधी मिळावा तसंच आपला परिसर सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी माझा कितीही कट्टर दुश्मन असेल तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा राहील असे, मतही खडसेंनी व्यक्त केले आहे.

#EknathKhadse #NCP #MNS #BJP #ChandrashekharBawankule #Shivsena #RahulKalate #NCP #Jalgaon #Mumbai #ShashikantWarishe #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended