• 2 years ago
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. तर केंद्र सरकारने येत्या 14 फेब्रुवारी रोजी 'काऊ हग डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांची होली काऊ म्हणजे अदानी आहे. त्यांनी अदानीला हग केलं आहे. एवढ्या मोठ्या काऊला हग केल्यानंतर दुसरं काही राहिलं नाही, असं राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

#SanjayRaut #GautamAdani #PMModi #NarendraModi #BJP #ShareMarket #CowHugDay #ValentineDay #BalasahebThorat #Shivsena #Congress #NanaPatole #Politics #Maharashtra

Category

🗞
News

Recommended