Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/6/2023
संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. मात्र या निवडणुकीदरम्यान मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. निवडणुकीपूर्वी तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. दरम्यान, या प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान थोरात यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला.

#BalasahebThorat #SatyajeetTambe #NanaPatole #Congress #AshokChavan #Nashik #MLCElection2022 #Sangamner #MVA #Maharashtra

Category

🗞
News

Recommended