Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/23/2023
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विधिमंडळात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होत आहे. एकीकडे हे उत्साहाचे वातावरण तर दुसरीकडे यावरून ठाकरे आणि शिंदे गटात शिमगा सुरू आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या विधानानंतर शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांची अक्कलच काढली. हिंदू जनजागृती महारॅलीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना शिरसाट यांची जीभ घसरली.

#AdityaThackeray #SanjayShirsat #EknathShinde #BhagatSinghKoshyari #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended