• last year
बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद सर्वश्रुत आहे. मात्र सध्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भाजपसोबत जवळीक वाढलीय आणि यावरूनच पुतण्या आमदार संदीप क्षीरसागरांनी काकांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. काका जयदत्त क्षीरसागरांकडून भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जातोय. ज्यांच्याकडे सत्ता त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलंय. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर यावं, असं आव्हान पुतण्या संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिलं आहे.

#JaydattaKshirsagar #SandeepKshirsagar #BJP #Beed #NitinDeshmukh #DevendraFadnavis #SanjayRaut #Shivsena #EknathShide #ACB #SatyajeetTambe #MVA #UddhavThackeray #SupremeCourt #ElectionCommission #Maharashtra

Category

🗞
News

Recommended