Pankaja Munde:'ज्या संस्कारामध्ये मी वाढले...'; पंकजा मुंडेंनी सांगितले मौन आंदोलनाचे कारण

  • 2 years ago
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे परळीतील गोपीनाथ गडावर दाखल झाल्या असून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतले आहे. पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे, आई प्रज्ञा मुंडे यादेखील उपस्थित असून त्या देखील मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्या. यावर्षी गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त पंकजा मुंडे समर्थकांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.त्याचसोबत गोपीनाथ गडावर काही काळ मौनदेखील त्या बाळगणार आहेत.