राऊतांनी केलेल्या 'स्क्रिप्ट'च्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार | BJP | Shivsena | Maharashtra |

  • 2 years ago
राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाकडून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावर बोलण्याची स्क्रिप्ट तयार करुन देण्यात आली आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच महाराष्ट्राची जनता शिवरायांचा अपमान अजिबात सहन करणार नाही, दोन दिवसात याबाबतचं पुढचं पाऊल काय असेल हे सांगितलं जाईल, असंही राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

#ChandrashekharBawankule #SanjayRaut #BasavarajBommai #EknathShinde #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Karnataka #Maharashtra #Border #BorderDispute #hwnewsmarathi