Sudhanshu Trivedi यांच्या वक्तव्यावर Amol Kolhe संतापले, तुम्हाला नेमकं काय खुपतंय?

  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यता आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याच वक्तव्यावरून शिंदे गटाला आता स्वाभिमान कुठे आहे? असा सवाल केला. हा वाद ताजा असतानाच आता पुन्हा एकदा भाजप प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाचवेळा पत्र लिहिलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे आक्रमक झाले आहेत, त्यांनी भाजपाला सुनावलं आहे.

#AmolKolhe #SudhanshuTrivedi #ChhatrapatiShivajiMaharaj #BJP #Maharashtra #SharadPawar #NCP #BhagatSinghKoshyari #NitinGadkari #DrBabasahebAmbedkar #Aurangzeb #HWNews

Recommended