राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका | Aditya Thackeray| Shivsena| Rahul Gandhi

  • 2 years ago
"गेल्या दोन दिवसांपासून राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वाद चालू असल्याचं दिसून येत आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती आणि ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना केलं होतं. या वक्तव्यावरून भाजपाकडून आणि मनसेकडून काँग्रेस आणि ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेही राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमद्ये सहभागी झाले होते
पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी आजच्या स्थितीवरही भांडण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेशी मीही सहमत आहे. पण सध्याच्या स्थितीसाठीही राष्ट्रीय पक्षांनी भांडायला पाहिजे. आपण सगळे ५० वर्षांपूर्वी किंवा १०० वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होतं, यावर भांडायला लागलो, तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आत्ताच्या स्थितीसाठी कोण भांडणार?” असं आदित्य ठाकरे म्हणाले."

#AdityaThackeray #RahulGandhi #VeerSavarkar #BharatJodoYatra #HWNews #SanjayRaut #Shivsena #Maharashtra #Congress