जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा; विनयभंगाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

  • 2 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

#JitendraAwhad #NCP #BJP #IPCSection354 #Rashtravadi #VidyaChavan #RidaRashid #AshsihShelar #PriyankaChaturvedi #ViralVideo #Kalva #Mumbra #RutaSamant #Shivsena #HWNewsMarathi

Recommended