BEST च्या कंत्राटी कामगारांचा संप मागे; 7500 रुपये Bonus देण्याचे मंजूर | Best Bus |

  • 2 years ago
दिवाळीचा बोनस, पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी सकाळपासून प्रतीक्षा नगर आणि मजास आगारातील बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला होता. मात्र, आता बेस्टच्या कंत्राटी कामगारांचं कंत्राट असणाऱ्या मातेश्वरी या कंपनीने बोनस देण्याचा जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. जे कामगार वर्षभर सेवेत रुजू होते त्यांना 7500 रुपये बोनस देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तसेच इतर मागण्यांचा विचार केला जाईल असे देखील आश्वासन कंपनीने दिले आहे. मात्र, बाकी मागण्या 15 दिवसात पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

#BestBus #diwali2022 #Bonus #Mumbai #hwnewsmarathi

Recommended