शिंदे गटाला सोबत घेऊन राज्यात सत्तेत आलेल्या भाजपनंच शिंदे गटाला सुरुंग लावला की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण खुद्द शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याची माहिती मिळतेय.