हा टाईम बॉम्ब मुंबईत फुटल्याशिवाय राहणार नाही!, जितेंद्र आव्हाड यांचा रेल्वेला इशारा | NCP |

  • 2 years ago
"एसी लोकलमुळे (AC Local Train) वारंवार होणाऱ्या लोकलच्या खोळंब्यामुळे कळव्यातील रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाला. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रेल्वे (Railway) प्रशासनाला इशारा दिला आहे. एसी लोकलमुळे कळवा-मुंब्रातील एक ते दीड लाख प्रवाशांचा खोळंबा होत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या काळात एसी लोकलमधून फिरणं शक्य नाही. त्यामुळे रेल्वेने तात्काळ वेळीच पावलं उचलावीत. नाही तर आम्ही आंदोलन करू. हा टाईम बॉम्ब आहे, हा मुंबईत फुटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
"

#JitendraAwhad #ACLocalTrain #NCP #Railway #MumbaiLocal #Lifeline #Kalwa #Mumbra #HwNews

Category

🗞
News

Recommended