राज्यसभेसाठी सहाव्या जागेची अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. हा पराभव म्हणजे सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. पहाटे चार वाजता हा निकाल जाहीर होताच शिवसेनेचे नेते संजय राऊत तडक विधानभवनाबाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘भाजपने नक्कीच जागा जिंकली, परंतु त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही’, असं राऊत यांनी जाहीर केलं.
#SanjayRaut #DhananjayMahadik #SharadPawar #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJPShivsena #RajyaSabha #Maharashtra #HWNews
#SanjayRaut #DhananjayMahadik #SharadPawar #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJPShivsena #RajyaSabha #Maharashtra #HWNews
Category
🗞
News