• 2 years ago
बुधवारी आठ जून रोजी औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी सभा पार पडली. या सभेसाठी एक शिवसैनिक खास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आला होता. एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो याचे अनेक उदाहरण राजकारणामध्ये पहायला मिळतील. मात्र औरंगबादेत उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आलेल्या या शिवसैनिकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा एक शिवसैनिक बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला औरंगाबाद येथे आला.

#UddhavThackeray #Aurangabad #ShivSena #AnkushPawar #AnkushWagh #SanjayRaut #RamRam #Jalna #ShriRam #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended