राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लातूर दौऱ्यावर असताना अचानक ताप आला होता. आपला दौरा रद्द करून ते तातडीने मुंबईत परतले होते. त्यानंतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली होती. त्यानंतर फडणवीस यांनी जनसंपर्क, बैठक, चर्चा यांना उपस्थिती दर्शविली नव्हती. मात्र, आता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित रहाणार आहेत.
#DevendraFadnavis #Covid #RajyaSabha #VidhanParishad #MLC #BJP #HWNews
#DevendraFadnavis #Covid #RajyaSabha #VidhanParishad #MLC #BJP #HWNews
Category
🗞
News