• 2 years ago
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगांव पठार गावाअंतर्गत असणाऱ्या धादवडवाडी परीसरात असणाऱ्या रामेश्वरदरा येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी लागणारा रस्ताच जीवघेणा आहे. त्यामुळे रस्त्याअभावी पालकांनी विद्यार्थ्यांचे दाखलेच शाळेतून काढून आणले आहेत. एकीकडे विकासाच्या गप्पा होत असताना निवारा, रस्ते, विज आणि पाणी या मूलभूत सुविधांचा शासन प्राधान्य देत आहे. मात्र स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही रामेश्वर दरा मात्र विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

#Sangamner #Ahmednagar #School #Dhadwadwadi #Rameshwardara #Students #Electricity #Water #BasicNeeds #Teacher #MVA #UddhavThackeray #BJP #NCP #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended