राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा. घर खाली करण्याच्या ईडीने दिलेल्या नोटिसला दिल्ली हायकोर्टाने दिली स्थगिती - खडसेंचे वकील मोहन टेकवडे यांची माहिती. मोहन टेकवडे यांनी ईडीला पत्र लिहून दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या ऑर्डरसंदर्भात कळवलं. दिल्ली हायकोर्टाने ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेवर आणि अडजुडीकटिंग अथोरिटीने दिलेल्या ऑर्डरवर स्थगिती दिली. एकनाथ खडसे यांनी घर खाली करावं लागणार नाही. ईडीने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याची नोटीस दिली होती.
#EknathKhadse #SharadPawar #NCP #ED #DelhiHighCourt #Relief #BJP #MVA #Muktainagar #Jalgaon #Maharashtra #HWNews
#EknathKhadse #SharadPawar #NCP #ED #DelhiHighCourt #Relief #BJP #MVA #Muktainagar #Jalgaon #Maharashtra #HWNews
Category
🗞
News