• 3 years ago
कऱ्हाड ः केंद्र सरकारने ओमिक्राॅनबाबत अत्यंत दक्षतेने पावले उचलली आहेत. त्याच्या फैलावाची गती पाहतस सर्वच राज्य सरकारांनीही त्या सगळ्या दक्षतेच्या सूचना गांभिर्याने घ्याव्यात, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी केले. मंत्री डाॅ. पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी कऱ्हाडच्या कृष्णा हाॅस्पीटलला भेट दिली. तेथे अटलबिहारी वाजपेयी याच्या स्मृतीनिमित्त आयोजित सुशासन दिनाच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (व्हिडिओ : सचिन शिंदे)
#karad #karadnews #omicron #omicronnews #bharatipawar

Category

🗞
News

Recommended