#Shorts #DailyYoga आजचे आसन : नीरलंबासन | Sakal Media | SAAM TV | Dainik Gomantak |

Sakal

by Sakal

7 470 views
#Shorts
#DailyYoga

आजचे आसन : नीरलंबासन

दीर्घायुषी व्हायचं असेल तर योग करा, असा सल्ला कायमच देण्यात येतो. भारतात अनादी काळापासून योग केला जातो. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आजही आपल्याला प्राणायाम किंवा हलके योग प्रकार करताना दिसून येतात. विशेष म्हणजे कित्येक काळापासून योग केल्यामुळे आजदेखील ही ज्येष्ठ मंडळी फिट असल्याचं पाहायला मिळतं. उलटपक्षी सध्याच्या अनेक तरुणांमध्ये वयाच्या २५ व्या वर्षापासूनच कंबरदुखी, पाठदुखी अशा समस्या निर्माण होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच वर्कआऊट करण्यासोबतच तरुणांनी योग करणं गरजेचं आहे. त्यातच पाठदुखीसारख्या समस्यांवर नीरलंबासन कसं फायदेशीर ठरतं ते जाणून घेऊयात..

नीरलंबासन करण्याचे फायदे -

१. पाठदुखीची समस्या दूर होते.
२. पाठीचा कणा व ओटीपोट यांना होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
३. नीरलंबासन केल्यामुळे पाठीच्या कणाशी निगडीत समस्या दूर होतात.
४. पाठीच्या कणाचे स्नायू लवचिक होतात.
५. हात, खांदे, मान व पोट यांचे स्नायू बळकट होतात.
६. फुफ्फुसांची काम करण्याची क्षमता वाढते.
७. मानसिक संतुलन आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.


#sakal #yogaurja #devyanisyogaurja #yogasan #yoga #DailyYoga #saamtv #sakalmedia #reels #Dainikgomantak