शेततळ्यातील ताज्या मासोळीवर ग्राहकांची झुंबड | Latest Marathi News I मराठी ताज्या बातम्या |

  • 3 years ago
धाबा (चंद्रपूर) : अनेक शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळले आहेत. त्यात मस्त्यपालनाकडे अनेक शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील प्रयोगशील शेतकरी गजानन पाल यांनी दोन शेततळ्यात मस्त्यपालन सूरू केले. मारबतीच्या दिवशी त्यांनी शेततळ्यातील मासोळी विक्रीला काढली. ताजी मासोळी असल्याने मासोळी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड लागत आहे. दोन्ही शेततळ्यातून तीन लाखांचे उत्पन्न काळे यांना अपेक्षित आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवश्याची झाली आहे. मात्र अशा स्थितीतही अनेक शेतकरी हिमंत न हारता शेतीपूरक व्यवसायाची कास धरून उत्पन्न वाढविण्यासाठी कष्ट उपसत आहेत.
(व्हिडिओ : निलेश झाडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended