• 3 years ago
पुणे - मध्यमवर्गीय कुटुंबातील श्रीपाद चारचौघांसारखाच शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागतो. परंतु सामाजिक जाणिवेचे भान ठेवत त्याने संसार बाजूला ठेवून सामाजिक कृतज्ञतेचा संसार मांडला आहे. स्वत:च्या आणि पत्नीच्या पगारातील काही रक्कम बाजूला ठेवून त्यातून शिक्षणाची आवड असणाऱ्या दुर्गम भागातील आठ मुलांच्या उच्च शिक्षणाचे पालकत्व त्याने स्वीकारले आहे. त्यामुळे या मुलांचे अवकाश विस्तारले आहे.
श्रीपाद घोडके आयटी क्षेत्रात तर त्याची पत्नी शलाका एका शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करते. हे दोघे गेल्या बारा वर्षांपासून आपल्या पगारातील काही रक्कम बाजूला ठेवून सामाजिक संस्थांना मदत करतात. व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी परभणी जिल्ह्यातील ‘स्वप्नभूमी’ या संस्थेला मदत देण्यास सुरवात केली. संस्थेत दुर्गम भागातील एकल पालकत्व असलेली ही मुले आहेत.

Category

🗞
News

Recommended