अरबी समुद्रात साकारण्यात येणार असलेल्या शिवस्मारकाचे भूमीपूजन आणि जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, 24 डिसेंबर रोजी झाले. या जागतिक दर्जाच्या भव्य नियोजित स्मारकाच्या समारंभासाठी राज्यभरातून आणण्यात आलेल्या जल आणि प्रमुख गडकिल्ल्यांची माती असलेला कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मुख्य समारंभासाठी सुपुर्द केला.
Category
🗞
News