महाराष्ट्राचा भूगोल अन इतिहासाला सेनापतीत्व देत आपल्या असामान्य कर्तृत्वाने स्वराज्यनिर्मिती करणाऱ्या शिवछत्रपतींच्या चरित्राची जादू महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून केव्हाच सातासमुद्रापार गेली आहे. अगदी जगतजेत्त्या नेपोलियनच्या फ्रान्समध्येही. फ्रान्समधील इतिहासाचे अभ्यासक फ्रान्सिस गोतिए यांनाही शिवचरित्राने भुरळ घातली असून, ते पुण्यातील लोहगाव येथे शंभर कोटी रुपये खर्चून भव्य संग्रहालयाच्या माध्यमातून शिवचरित्राचा आलेख मांडणार आहेत.
Category
🗞
News