पुणे - अंधत्वाची काठी आणि गरिबी त्याच्या आयुष्यात हातात हात घालूनच आल्या. परंतु, डोळे नसताना डोळ्यापलिकडे पाहण्याची बुद्धीतील शक्तिशाली संवेदना मात्र दिली. याच संवेदनेतून त्यानं आयुष्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीनं पाहिलं. शिकला, वाढला आणि कोणाच्याही आधाराविना उभाही राहिला. आता कमी होती, ती हातातल्या काठीऐवजी जोडीदार म्हणून एखादा हात हातात मिळण्याची. तो हात त्याला आज मिळाला. नुसताच नव्हे तर, डोळस हात. अशीच डोळस सोबत सातजन्म करण्याचं वचन देणारा हात आहे, सुजाता खंदारे या तरुणीचा.
Category
🗞
News