केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येत असून आगामी निवडणुकांच्या रणनीतीसह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा ते आढावा घेणार आहेत. या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली. या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते राम कदम म्हणाले की, 'अमित शाह मुंबईत येत आहेत त्यामुळे विरोधीपक्ष धास्तावलेला दिसतो आहे' याचसोबत 'राहूल गांधीची सभा "जोकर सभा" असते' अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
Category
🗞
News