Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/15/2023
Arvind Sawant: 'लोकशाही धोक्यात आली असताना मानवी मूल्य जपण्यासाठी..वज्रमुठ'; अरविंद सावंतांची टीका

'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना(ठाकरे गट) यांनी एकत्र येऊन वज्रमुठ बांधली आहे. त्या पाश्वभूमीवर नागपुरात सभा आयोजित करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधान दिले. भारतीय जनता पक्षाच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे. भारतीय संविधानातील मानवी मुल्य जपण्यासाठी वज्रमुठ आहे' असं मत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केले. यवतमाळ येथे आले असता, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर सडकून टीका केली. 'राज्यातील शेतकरी संकटात आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोजगार उपलब्ध करून दिले जात नसून सर्व न्यायसंस्था भाजपाने हातात घेतल्या' हा भारतीय लोकशाहीवर हल्ला असल्याची टीका खासदार सावंत यांनी केली

Category

🗞
News

Recommended