• last year
Kolhapur: अमल महाडिकांचे आव्हान स्वीकारत ऋतुराज पाटील बिंदू चौकात आले पण... ; पाहा नेमकं घडलं काय?

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भलतीच रंगू लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी रात्री उशिरा महाडिक आणि पाटील गट आमने सामने पाहायला मिळाले. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी खुल्या चर्चेसाठी बिंदू चौकात यावं असं आव्हान माजी आमदार अमल महाडिक यांनी दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अमल महाडिक हे बिंदू चौकात दाखल झाले त्यानंतर काही वेळाने आमदार ऋतुराज पाटील दाखल झाले.

Category

🗞
News

Recommended