• 2 years ago
'शिंदेंनी भक्तीभावाने अयोध्येला जावं, पण... '; भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना अयोध्या दौऱ्यावरून सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) कार्यकर्ते कालच (७ एप्रिल) विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले आहेत. या रेल्वेला हिरा झेंडा दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे काल ठाणे रेल्वेस्थानकात गेले होते. अयोध्येत मुख्यमंत्री आणि सर्व कार्यकर्ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याबाबत राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, "भक्ती भावाने मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जावे, राजकारण करू नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा असल्याने त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे" असं भुजबळ म्हणाले आहेत

Category

🗞
News

Recommended