खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठणावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची आणि उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली जाईल. त्या ठिकाणी आपण हनुमान चालीसा म्हणणार, अशी घोषणा नवनीत राणांनी केली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, ही चांगली गोष्ट असून मी त्याच स्वागत करतो. हनुमान चालीसेला कोणाचाच विरोध नाही. तसंच त्या कामातून त्यांना समाधान मिळत असेल, तर त्यांना समाधान मिळून द्यायला आम्ही तयार आहोत, असा मिश्किल टोला त्यांनी नवनीत राणांना लगावलाय.
Category
🗞
News