प्रवीण गोपाळेंच्या हत्येप्रकरणी अजित पवार आणि वकिलांनी दिली प्रतिक्रिया

  • last year
प्रवीण गोपाळेंच्या हत्येप्रकरणी अजित पवार आणि वकिलांनी दिली प्रतिक्रिया

पुण्यातील शिरगावमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळेंची तीन जणांनी हत्या केली होती. या घटनेप्रकरणी प्रवीण गोपळेंच्या भावाने तक्रार दिल्याप्रमाणे महेश भेगडे याच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली. तर, मंगळवारी मुख्य मारेकरी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हत्या प्रकरणात महेश भेगडेला गोवण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी आरोप केलाय. पोलिसांनी योग्य तपास करावा, महेश भेगडे हे निर्दोष असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपाळे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन तपास करू नये, असं म्हटलं होतं#pune #shirgaon #pravinngopale #maheshbhegde